लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव शुक्रवारी विधानभवनाच्या लिफ्टमध्ये अडकले. यावेळी त्यांची पत्नी डिंपलही त्यांच्यासोबत होती.
विधानभवनाच्या फिल्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही लिफ्ट अचानक बंद पडली. यामुळे, या लिफ्टमध्ये असलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल लिफ्टमध्येच अडकले.
माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले... आणि जवळपास ३० मिनिटांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी सुरक्षित बाहेर पडले.
उत्तरप्रदेश राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगानं शुक्रवारी विधानसभेत एका 'बाल संसद'चं आयोजन केलं होतं. यामध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांची पत्नी आणि खासदार डिंपल यादव, विधानसभा अध्यक्ष माता प्रसाद पांडे आणि कॅबिनेट मंत्री आझम खान मुलांची भेट घेणार होते. या कार्यक्रमाला जवळपास १५० मुलं उपस्थित होते.