बंगळुर : अॅमेझॉन भारतात गुंतवणार २१ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
आतापर्यंत अॅमेझॉनने भारतात २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
अॅमेझॉन या जगातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाइन रिटेलर कंपनीने भारतामध्ये आणखी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
भारतामधली सगळ्यात मोठी ऑनलाइन रिटेलिंग कंपनी बनण्याचे कंपनीचा उद्देश आहे. त्यासाठी डिस्काउंट्स, अत्याधुनिक दळणवळण व्यवस्था आणि अन्य बाबींमध्ये प्रचंड प्रमाणात नव्याने गुंतवणूक करण्यात येईल अशी चिन्हे आहेत.
बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या अमेरिकेतील एका समारंभात अॅमेझॉनचे चीफ एग्झिक्युटिव्ह जेफ बेझोज यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.