नवी दिल्ली : दादरी कांड, गोहत्या आणि बीफवर भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्तांना विधानांमुळे पंतप्रधान प्रचंड नाराज आहेत. या विधानांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर , खासदार साक्षी महाराज, मुजफ्फरनगरचे सरसाधनाचे आमदार संगीत ओम, खासदार संजीव बालियान आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना आपल्या घरी बोलावणं केलं आहे.
मात्र अमित शहा यांच्या घरी या सर्वांना बोलावण्यात आल्यानंतर, अमित शहा यांनी या नेत्यांना काय समज दिली, हे अजून समजू शकलेलं नाही, या नेत्यांना भडक विधानं न करण्याचा इशारा देण्यात आला असेल अशी चर्चा आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर
मुस्लिम या देशात राहू शकतात, त्यांना बीफ खाणं सोडावं लागेल, असं वादग्रस्त विधान केलं होतं, नंतर त्यांनी आपण असं काही म्हटल्याचं फेटाळून लावलं होतं.
भाजपा खासदार साक्षी महाराज
"आमची आई, गाईचा कुणीही अपमान करेल तर तो आम्ही सहन करणार नाही, आम्ही मरायला तयार राहू-मारू, आमच्या भारत मातेकडे कुणी बोट दाखवलं तरी आमचे लोक शहीद होतात, समोरच्यालाही मारतात, शरीराला जन्म देणारी जशी माता आहे, तशी आमची भारत माता आहे, तशी गाय सुद्धा आमची माता आहे." - भाजपा खासदार साक्षी महाराज
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.