अमिताभ यांना काडिमात्र अक्कल नाही - मार्कंडेय काटजू

Updated: Sep 18, 2016, 08:59 PM IST
अमिताभ यांना काडिमात्र अक्कल नाही - मार्कंडेय काटजू  title=

नवी दिल्ली - नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला आहे.

फेसबूकवर काटजू यांनी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'अमिताभ बच्चन एक असे व्यक्ति आहेत. ज्यांच्या डोक्यात अक्कल नावाचा प्रकार नाही. अनेक पत्रकार त्यांची उगाचच प्रशंसा करतात मला वाटते त्यांच्याकडेही अक्कलेची कमतरता आहे. 

'अभिनेता शिवाय दुसरं काय ?'

काटजू यांनी पुढे लिहिले आहे की, 'एका चांगल्या अभिनेत्याशिवाय अमिताभकडे दुसरे काय आहे ? काय त्यांच्याकडे कोणता वैज्ञानिक विचार आहे ज्यामुळे देशाला गंभीर समस्यांपासून मुक्ती मिळेल. वळोवेळी अमिताभ टीव्ही आणि सोशल मीडियावर देशहिताचे चांगले विचार व्यक्त करत असतात पण जर पैसे मिळत असतील तर कोण चांगल्या गोष्टी करू शकणार नाही.'