मुख्यमंत्र्यांवर चॉकलेट्सची पुडी फेकून तो ओरडला 'बॉम्ब'

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरात रविवारी एक विचित्र घटना घडली. 

Updated: Feb 22, 2016, 09:31 AM IST
मुख्यमंत्र्यांवर चॉकलेट्सची पुडी फेकून तो ओरडला 'बॉम्ब' title=

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरात रविवारी एक विचित्र घटना घडली. एका समारंभादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या बोलत असताना एका  व्यक्तीने त्यांच्या दिशेने कागदाची पुडी भिरकावून 'बॉम्ब' असे ओरडला. यामुळे एकच घबराट पसरली. 

सुदैवाने ही पुडी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही. सुरक्षारक्षकांनी ही पुडी उघडून पाहिले असता त्यात केवळ चॉकलेट्स सापडली.  सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. 

सदर व्यक्ती  न्हावीकाम करत असल्याचे समजले आहे. बी एस प्रसाद (३०) असे त्याचे नाव आहे. 'आपल्या समाजासाठी मुख्यमंत्री चांगले काम करत नसल्याने आपण हे केले,' असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.