जेएनयू वाद : फरार उमर खालिदसह आरोपी विद्यार्थी विद्यापीठात दाखल

देशविरोधात घोषणाबाजी झाल्यानं चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये आता दुसरा अंक सुरु झालाय. देशद्रोहाचा आरोप असलेले आणि सध्या फरार असलेला उमर खालिदसह काही विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले आहेत. 

Updated: Feb 22, 2016, 07:19 AM IST
जेएनयू वाद : फरार उमर खालिदसह आरोपी विद्यार्थी विद्यापीठात दाखल title=

नवी दिल्ली : देशविरोधात घोषणाबाजी झाल्यानं चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये आता दुसरा अंक सुरु झालाय. देशद्रोहाचा आरोप असलेले आणि सध्या फरार असलेला उमर खालिदसह काही विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले आहेत. 

दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री विद्यापीठात येऊन पहाणी केली. शेकडो विद्यार्थी सभा घेण्याच्या तयारीत आहेत. उमर खालिदला अटक करण्यासाठी पोलिसांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. मात्र तो हाती आला नाही. उमर रात्री जेएनयूच्या कॅम्पसमध्ये परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॅम्पसबाहेर बंदोबस्त वाढवला. 

उमर खालिदसोबत इतर आरोपी विद्यार्थीही आहेत. त्यामध्ये रामा नागा, आशुतोष, अनंत, अर्निबान यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी सकाळपर्यंत शरण येण्यास सांगितलं आहे. तसं न झाल्यास पोलिस त्यांना अटक करतील, अशी शक्यता आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठात दाखल होण्यास विद्यापीठ प्रशासनानं परवानगी दिली नाही.