रामेश्वर : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना लाखोंच्या जनसमुदायाने शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये शासकीय इतमामात आपल्या लाडक्या 'मिसाईल मॅन'ला दफन करण्यात आलं...
लाखोंचा शोकाकूल जनसागर... डोळ्यांतून वाहणारे अश्रू... तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव... आणि 'कलामसाहब अमर रहे'च्या घोषणा... रामेश्वरम हे कलामांचं जन्मगाव शोकसागरात बुडालं होतं... केवळ रामेश्वरमच नव्हे, तर अवघा देश त्यांच्या जाण्यानं हळहळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू, तामिळनाडूचे राज्यपाल के. रोशय्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते अंत्यविधीवेळी रामेश्वरमपासून जवळच असलेल्या पाईकरम्बू येथे उपस्थित होते. स्मशानभूमीत उपस्थित लोकांनी दोन मिनिटं मौन पाळून, जनसामान्यांच्या राष्ट्रपतींना श्रद्धांजली वाहिली.
दफनविधीपूर्वी मोदी यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर त्यांनी कलाम यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तिन्ही सेनादलांचे प्रमुखही अंत्यविधीवेळी उपस्थित होते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास रामेश्वरम येथून फुलांनी सजविलेल्या गाडीतून कलाम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
डॉ. कलाम यांच्या पार्थिवाचे पाईकुरुम्बू येथे दफनविधी करण्यात येणार आहे. आपल्या रामेश्वर भूमीतील लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्यविधीवेळी लाखोंचा जनसागर लोटला होता.
सकाळी । ११.१० वाजता
रामेश्वरम : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. कलाम यांना केला अखेरचा सलाम.
सकाळी । ११.०० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले.
सकाळी । १०.५२ वाजता
डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीसाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, व्यंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूही उपस्थित.
सकाळी । १०.५० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे उपस्थित राहून डॉ. कलाम यांना अखेरचा निरोप देणार.
सकाळी । १०.४० वाजता
डॉ. कलाम यांची अंत्ययात्रा सुरू, लाडक्या राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी रामेश्वरममध्ये लोकांची मोठी गर्दी.
सकाळी ०९.४० वाजता
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अंत्ययात्रेला थोड्याच वेळात होणार सुरूवात, शासकीय इतमामात दिला जाणार अखेरचा निरोप.
चेन्नई : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास आता सुरू झालाय. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सगळे प्रॉटोकॉल मोडून विमानतळवर हजेरी लावली.
अब्दुल कलामांचं व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांचे सगळ्या राजकीय पक्षांशी असणारे जवळकीचे संबंधं. काल डॉ. कलाम यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर दोन्ही सभागृहात आदरांजली मिनिटभराचं मौन पाळण्यात आलं. यानंतर लोकसभा दोन दिवसांसाठी तर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलीय.
दरम्यान भाजपच्या संसदीय पक्षांच्या बैठकीत डॉ.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.