नवी दिल्ली : दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये रिक्त झालेल्या पदांचा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी विविध श्रेणींतील ३०६७ पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आल्याचे सूचना आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे.
जेटली यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरावेळी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ३०६७ पदांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.
समूह ख आणि समूह ग पदांच्या भरतीसाठी कर्मचाऱ्यांची निवड आयोगाला एक वेळा विशेष मंजुरी देण्यात आली. त्यांनी सांगितले की, २३६७ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उमेदवारांची पोलिस व्हेरिफिकेशन सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.