नवी दिल्ली: हमारा बजाज...हमारा बजाज... हे एकेकाळी अतिशय लोकप्रिय झालेल्या जाहिरातीचे जिंगल पुन्हा एकदा कानी पडणार आहे.
बजाज चेतक स्कूटर पुन्हा बाजारात येणार आहे. चालवायला अतिशय सोपी आणि उत्तम मायलेज देणारी ही स्कूटर ऑटोमेटिक गियरवाली असेल अशी माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावरच्या बातमीतून पुढे आली आहे. बजाज ऑटो कंपनीनं आपलं स्कूटरचं चेतक हे ब्रॅण्ड पुन्हा एकदा नोंदणीकृत केलं आहे.
चेतक बंद न करण्याचा दिला होता सल्ला
- सन २००६ मध्ये राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज यांनी कंपनीचा कार्यभार सांभाळल्यानंतर बजाजच्या स्कूटरचे उत्पादन पूर्णपणे थांबवले होते. तरुणांचा ओढा पाहून केवळ मोटरसायकलच्या उत्पादनावर भर द्यायचं ठरलं होतं. पण राहुल बजाज यांनी स्कूटरचं उत्पादन बंद करू नये असा सल्ला दिला होता.
गियरवाली होती शेवटची स्कूटर
- बजाज चेतक कंपनीनं गियर बॉक्स असलेल्या स्कूटरचं उत्पादन घेतलं होतं. हे कंपनीचं शेवटचं मॉडेल होतं. ही स्कूटर लोकप्रिय झाली होती. परंतु होंडा, हीरो आणि टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या गियरवाल्या स्कूटरच्या उत्पादनांमुळं चेतकचं उत्पादन मागे पडलं आणि बजाजनं स्कूटरचं उत्पादन थांबवलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.