नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बॉलिवूडच्या दिग्गजांनीही दंड थोपटले आहेत. दरम्यान, लेखिका अरुंधती रॉय यांनीही दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
बॉलिवूडमधील दिग्गज कुंदन शहा, सईद मिर्झा, विरेंद्र सैनी यांच्यासह विविध २४ जणांनी गुरुवारी पुरस्कार परतीची घोषणा केली. यात अरुंधती रॉय यांच्याही नावाचा समावेश आहे. मात्र, अरुंधती रॉय यांचे आतापर्यंतचे सत्य काय आहे?
भारत विरोधी वक्तव्य करुन अरुंधती रॉयनेखूप प्रसिद्ध मिळविली. काश्मीर हे भारताचे केव्हा केव्हा अविभाज्य अंग राहिले आहे, असे बेधडक विधान केलेय. तर भारत काश्मीरवर अनके प्रकारे अत्याचार करत आला आहे. काश्मीरवरील भारतीय ताबा हा अत्याचार झालाय. काश्मीरमध्ये जर निवडणुका घेतल्या तर तेथील लोक स्वतंत्र होतील. मात्र, स्वतंत्र राहण्यापासून त्यांना मजबूर केले जात आहे, अशी अक्कलेचे तारे तोडले.
पाहा हा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.