ओवैसीने बिहारमध्ये उडविली लालू आणि नितीशची झोप

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मुस्लिम बहुल विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार उतरविण्याची तयारीत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीची झोप उृडाली आहे. 

Updated: Aug 18, 2015, 02:26 PM IST
ओवैसीने बिहारमध्ये उडविली लालू आणि नितीशची झोप title=

किशनगंज :  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मुस्लिम बहुल विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार उतरविण्याची तयारीत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीची झोप उृडाली आहे. 

सीमांचल भागात किशनगंज, अररिया, पुर्णिया आणि कटिहारमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात ओवैसी यांनी आपले उमेदवार उतरविले तर महाआघाडीला मोठा दणका बसू शकतो. 

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लहर असताना भाजपला सीमांचल भागात एकही लोकसभेच्या मतदार संघात यश मिळाले नव्हते. बिहारमध्ये एनडीएच्या ४० पैकी ३१ जागांवर विजय मिळविला होता. पण या भागात यश आले नव्हते. 

ओवैसी हैदराबादचे लोकसभा खासदार आहेत. त्यांनी रविवारी बिहारमधील सर्वाधिक मुस्लिम बहुल भाग असलेल्या किशनगंज येथे सभा घेतली. सभेतील गर्दी पाहून लालू, नितीश आणि काँग्रेसला घामटा फुटला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.