दुबईतून आलेले मोदी तडक बिहारमध्ये; सव्वा लाख करोडोंच्या विशेष पॅकेजची घोषणा

दुबईचा दौरा करून भारतात परल्यानंतर आज लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये दाखल झाले. आरा इथं भाजपच्या रॅलीत मोदींनी ९७०० करोड रुपयांची गुंतवणूक असलेल्या १० योजनांचं उद्घाटन केलंय.

Updated: Aug 18, 2015, 07:57 PM IST
दुबईतून आलेले मोदी तडक बिहारमध्ये; सव्वा लाख करोडोंच्या विशेष पॅकेजची घोषणा title=

पाटणा : दुबईचा दौरा करून भारतात परल्यानंतर आज लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये दाखल झाले. आरा इथं भाजपच्या रॅलीत मोदींनी ९७०० करोड रुपयांची गुंतवणूक असलेल्या १० योजनांचं उद्घाटन केलंय.

भोजपुरीमध्ये बोलत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आजच पहाटे - पहाटे आपल्या यूएईवरून भारतात दाखल झाल्याचंही त्यांनी उपस्थितांना सांगितलं. 'जे लोक माझा कार्यक्रम बनवत होते... ते मला समजावत होते की इतक्या घाईघाईत कसं जाणार? पण, तुम्ही हाक दिलीत आणि आम्ही पोहचलो... बिहारच्या कानाकोपऱ्याला भारताच्या प्रत्येक भागाला जोडण्यासाठी आलोय' असं मोदींनी यावेळी उपस्थितांना उद्देशून म्हटलं. 

मोदींच्या हस्ते आरा शहरात राष्ट्रीय महार्मागाचं भूमीपूजन पार पडलं. त्यानंतर आरा आणि सहरसामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा करण्याचा मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. याला 'परिवर्तन रॅली' असं नाव देण्यात आलंय. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकांच्या आधी गेल्या महिन्याभरात मोदींचा हा तिसरा दौरा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.