नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभांच्या रणसंग्रामाला सुरुवात झालीय. गोवा आणि पंजाबमध्ये मतदान होतंय. गोव्यात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झालीय.
गोव्यात 40 जागांसाठी मतदान होतंय. गोव्यात 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये होणार आहे. गोव्यात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
गोव्यातली मुख्य लढत ही भाजप आणि सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये होणार आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होतेय.
पंजाबमध्ये 117 जागांसाठी मतदान होत असून 1145 उमेदवार रिंगणात आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडावं यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आलीय.