‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी खुशखबर!

देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या एटीएम वापराच्या नियमांत काही बदल केलेत... या, नव्या नियमांमुळे जे ग्राहक आपल्या खात्यात २५ हजार ते १ लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्यावर भर देतात, त्यांना फायदा मिळू शकेल.

Updated: Oct 17, 2014, 06:30 PM IST
‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी खुशखबर! title=

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या एटीएम वापराच्या नियमांत काही बदल केलेत... या, नव्या नियमांमुळे जे ग्राहक आपल्या खात्यात २५ हजार ते १ लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्यावर भर देतात, त्यांना फायदा मिळू शकेल.

या अगोदर, एसबीआय ग्राहकांना एसबीआयच्या ‘एटीएम’मध्ये पाच वेळा आणि अन्य बँकांसाठी तीन वेळा ‘एटीएम’चा मोफत वापर करता येत होता. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी पाच रुपये शुल्क आकारलं जात होतं... तर तीन पेक्षा अधिक वेळा अन्य बँकांचं ‘एटीएम’ मशीन वापरल्यास २० रुपये शुल्क द्यावं लागतं.

परंतु, एसबीआयच्या नव्या नियमानुसार, आपल्या खात्यात २५ हजार ते १ लाखांपर्यंत शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना आता ‘एसबीआय’च्या एटीएमचा वापर अनलिमिटेड करता येणं शक्य झालंय. हे ग्राहक महिन्यातून कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करू शकतील... आणि तेही अगदी मोफत...

महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत बॅलन्स मेन्टेन करणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्याचाही यावेळी बँकेनं प्रयत्न केलाय. यानुसार, हे ग्राहक आपल्या बँकेच्या शाखेत एकदाही गेले नाहीत तर त्यांची एसबीआय एटीएम वापरची सीमा ५ हून ९ पर्यंत वाढवता येईल. म्हणजेच, हे ग्राहक ९ वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करू शकतील.

‘एसबीआय’नं जाहीर केलेल्या या नवीन नियमांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. आरबीआयनंही या नियमांना परवानगी दिलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.