हमीरपूर : महिलेच्या सन्मानावर आणखी एक घाला घालण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे घडला आहे. असे पहिलांदा झाले की एका महिलेचा लिलाव झाला. ही घटना मजगवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जराखर गावात घडली.
गावातील श्यामलाल नावाचा एक तरूण ओडिशा येथून एका महिलेला गावात आणले. त्याने त्या ठिकाणी महिलेला विकत घेतले होते. गावात येऊन त्या महिलेला विकण्याची इच्छा व्यक्त केली तर खरेदीदारांची गर्दी झाली. त्यावेळी या तरूणाने महिलेचा सार्वजनिक लिलाव करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
गेल्या गुरूवारी गावातील एका ठिकाणी तब्बल ५० जण जमा झाले. त्यांच्यामध्ये त्या महिलेला उभे करण्यात आले आणि तिचा लिलाव झाला. लिलावात तीन जण उभे राहिले. पण दोघांचे वय अधिक असल्यानने महिलेने त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला. तिसऱ्या व्यक्तीने अधिक बोली लावली आणि २५ हजारात महिलेला आपल्यासोबत घेऊन गेला.
या प्रकाराची पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यावेळी ठाण्याचे प्रमुखांनी पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.