भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा पुरवठा करणार ऑस्ट्रेलिया

भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा लवकरात लवकर पुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्मक टर्नबुल यांनी दिलं आहे. भारत भेटीवर आलेल्या टर्नबुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये शिक्षणापासून ते संरक्षणापर्यंत, अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर सहाकार्याचं आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिलं आहे.

Updated: Apr 10, 2017, 10:49 PM IST
भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा पुरवठा करणार ऑस्ट्रेलिया title=

नवी दिल्ली : भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा लवकरात लवकर पुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्मक टर्नबुल यांनी दिलं आहे. भारत भेटीवर आलेल्या टर्नबुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये शिक्षणापासून ते संरक्षणापर्यंत, अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर सहाकार्याचं आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिलं आहे.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नागरी अणूसहकार्य करार झाला आहे. त्यानंतर अद्याप युरेनियमचा पुरवठा मात्र सुरू झालेला नाही. टर्नबुल यांच्या भारत भेटीनंतर या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे.