अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क

महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.

Updated: Mar 6, 2017, 07:37 PM IST
अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क title=

नवी दिल्ली : महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे. हे नवे दर अॅक्सिस बँकेनं जाहीर केले आहेत.

असं असेल अॅक्सिस बँकेचं शुल्क

- होम ब्रॅन्चमध्ये अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना पाच व्यवहारांवर कोणतंही शुल्क लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी २.५० रुपये किंवा ९५ रुपये यातली जी रक्कम जास्त असेल ती आकारली जाईल.

- अॅक्सिक बँकेच्या दुसऱ्या शाखेमध्ये पाच व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही, पण दिवसाला जास्तीत जास्त ५० हजार रुपयेच काढता किंवा टाकता येतील. यानंतर एक हजार रुपयांसाठी २.५० रुपये किंवा ९५ रुपये यातली जी रक्कम जास्त असेल ती आकारली जाईल.

- पहिल्या पाच एटीएम व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. यानंतर प्रत्येक व्यवहारांवर २० रुपये शुल्क आकारण्यात येईल.