आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत

देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय. 

Updated: Nov 11, 2015, 06:33 PM IST
आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत  title=

चेन्नई : देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय. 

अधिक वाचा - 'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'

भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, प्राचीन ग्रंथांमध्ये बीफ खाण्यावर कोणत्याही प्रकारच्या बंदीचा उल्लेख नाही. इतकंच काय तर चरक संहिता लिहिणाऱ्या महर्षि चरक यांनी तर बीफ खाणं हे आजारावर फायदेशीरच ठरतं असं म्हटलंय.

अधिक वाचा - असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी

भार्गव हे 'सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉल्यिक्युलर बायोलॉजी'चे संस्थापकदेखील आहेत. जे लोक अधिक मेहनत करणाऱ्या किंवा बदलत्या हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांसाठी बीफ खाणं फायदेशीरच ठरतं, असा उल्लेख चरक संहितेत असल्याचं 87 वर्षीय भार्गव यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा - भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे फार कमी वैज्ञानिक माहिती असल्याचंही भार्गव यांनी म्हटलंय. देशात असहिष्णुता वाढल्याच्या विरोधात पी. एम. भार्गव यांनी आपला पद्म विभूषण सन्मान यापूर्वीच परत केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.