कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जाहिर केलं होतं.

Updated: Nov 11, 2015, 06:06 PM IST
कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी title=

अमृतसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जाहिर केलं होतं.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. 

अमृतसरच्या डोगलाई इथल्या 'वॉर मेमोरियल'ला पंतप्रधानांनी भेट दिलीय. हे स्थान सर्वात कठिण युद्ध स्थळ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणावर भारतीय सैनिकांनी 22 सप्टेंबर 1965 रोजी विजय मिळवला होता. त्यानंतर मोदींनी पंजाबमध्ये अमृतसर, खेम करन रोडवर वलतोहाजवळ असल उत्तर स्मारक आणि परमवीर चक्र विजिते कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद यांच्या समाधिवरही पुष्कचक्र अर्पित केलं.

देशाचे जवान हे माझं कुटुंब असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करून आपल्याला कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाल्याची प्रतिक्रियाही मोदींनी दिलीय. 1965 च्या युद्धात भारतीय जवानांच्या कामगिरीमुळं पाकिस्तानला धूळ चारण्यात यश आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.