close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

Updated: Dec 2, 2015, 11:07 AM IST
RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

आजम खान यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर वादग्रस्त विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्ये दिलेल्या गे सेक्सवर निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, असे म्हटले होते.

रविवारी रामपूर येथे एका कार्यक्रमात खान बोलत होते. यावेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे संबंध ठेवणारे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, त्यांच्या या वक्‍तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी खान यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आता त्यांना योग्य ठिकाणी पोहोचविण्याची वेळ आल्याची टीका केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.