पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग - बाबा रामदेव

बाबा रामदेव यांनी पद्म पुरस्काराबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केलाय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी 'राजकीय अनुकुलता असणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळतात' असं वक्तव्य केलंय.   

Updated: May 9, 2015, 04:02 PM IST
पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग - बाबा रामदेव title=

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी पद्म पुरस्काराबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केलाय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी 'राजकीय अनुकुलता असणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळतात' असं वक्तव्य केलंय.   

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांसाठी लॉबिंग होते, असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. पण, याचवेळी चांगलं काम करणाऱ्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार दिले जातात, असंही त्यांनी मान्य केलंय. 

महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या संभावित नावांच्या यादीत बाबा रामदेव यांचंही नाव होतं. पण, त्यांनी मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. आपण योगी आणि संन्यासी आहोत, आणि आपल्याला या पुरस्कारांनी सन्मानित केलं जाण्याची आवश्यकता नाही, अशा आशयाचं पत्रही लिहिलं होतं. 

मात्र आता  बाबा रामदेव यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पद्म पुरस्कार वितरणाच्या प्रक्रियेवर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधीही पद्म पुरस्काराच्या वितरणाच्या प्रक्रियेवर राजकीय नेत्यांपासून खेळाडूपर्यंत अनेकांनी आक्षेप घेतला होता. 

 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.