बंगळुरू: एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये सहा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी बिहारच्या एका स्केटिंग प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ही अटक झालेली आहे. या प्रकरणामुळं बंगळुरूत प्रचंड रोष आहे. नागरिक रस्त्यावर उतरलेत. तर आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील फोटो पोलिसांना सापडलेत.
पोलीस आयुक्त राघवेंद्र औरदकर यांनी आठ जणांच्या केलेल्या चौकशीत मुस्तफा नावाच्या व्यक्तीची अटक केलीय. सर्वांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अतिरिक्त पोलीस आयुक्त (क्राईम) प्रणव मोहंती यांनी सांगितलं, मुस्तफा (31) यातील मुख्य आरोपी आहे. त्याला अटक केलीय. या प्रकरणी आता आणखी अटक होऊ शकते. 2 जुलैला घडलेली ही घटना 14 जुलैला समोर आली आणि त्यानंतर प्रकरणातली ही पहिली अटक.
चिमुरडीच्या आईला काही दिवसांनंतर या अत्याचाराबद्दल कळलं मग तिला डॉक्टरांकडे नेलं असता बलात्कार झाल्याचं कळलं. तेव्हा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. औदरकर यांनी सांगितलं की, पोलिसांनी मुस्तफा जवळून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलाय ज्यात लहान मुलींचे अश्लील फोटो आहेत.
मुस्तफा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील राहणारा आहे आणि मागील 20 वर्षांपासून बंगळुरूत राहतोय. त्यांनी सांगितलं की, आरोपीच्या लॅपटॉपमध्ये शालेय विद्यार्थिनींवर केलेल्या बलात्काराचे व्हिडिओ आहेत जे इंटरनेटवरुन डाऊनलोड केले गेलेले आहेत. यावरुन त्याच्या मानसिकतेबद्दल कळतंय.
पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, मुस्तफाला उद्या कोर्टात उपस्थित करण्यात येईल. ‘विबग्योर स्कूल’मध्ये झालेल्या या घटनेनंतर शाळेवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याची आणि अटक न केल्यानं औदरकर नागरिकांच्या रागाचा सामना करतायेत. शाळेवर आरोप आहे की त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.