बँकांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत PAN नंबर दिला नाही तर...

 सरकारने बँकेतील सर्व खातेदारांना आपला पॅन नंबर बँकेत २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यास सांगितले आहे. यात आपल्या ग्राहकांना ओळखा ( केवायसी) चे पालन करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. 

Updated: Jan 17, 2017, 10:37 PM IST
 बँकांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत PAN नंबर दिला नाही तर...  title=

नवी दिल्ली :  सरकारने बँकेतील सर्व खातेदारांना आपला पॅन नंबर बँकेत २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यास सांगितले आहे. यात आपल्या ग्राहकांना ओळखा ( केवायसी) चे पालन करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांना पॅनची डेटेल द्यावी अशी सूचना लिखित स्वरूपात देण्यास सुरूवात केली आहे. आपल्या पॅन कार्डाची डिटेल न देणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्यांवर बंदी आणण्याची तयारी सरकार करत आहे. 

बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, आम्ही आमच्या मूल्यवान ग्राहकांना पॅन नंबर बँकेत नोंदण्यास सांगितले आहे. ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. 
ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही त्यांनी फॉर्म ६० चा वापर करावा.