बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात हौतात्म पत्कारलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज बेळगावमध्ये हुतात्मा दिन पाळण्यात आला. यावेळी बेळगावमधील व्यवहार बंद होते.
सीमाप्रश्नी आजवर अनेक आंदोलनं झालीत. या आंदोलनात अनेकांनी हौतात्म्य पत्कारलं. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज सर्वांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीनं केलं होतं.
भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमलेल्या राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. तर १६ जानेवारी १९५६रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी या अहवालातील
शिफारसी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि बेळगाव कारवारचा मराठी सीमाभाग तत्कालिन म्हैसूर राज्यात गेला. मुंबई, बेळगावसह अनेक ठिकाणी प्रक्षोभक उद्रेक होऊन १७ जानेवारी रोजी बेळगावमध्ये गोळीबार झाला होता आणि त्यात अनेकांनी प्राण गमावले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.