बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Oct 17, 2014, 11:30 PM IST
बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी  title=

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १२ ऑक्टोबर रोजी बंगळुरु येथे कन्नड साहित्यिक आणि संघटनांच्या नेत्यांपुढे बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर करणार असल्याची घोषणा केली होती. याबाबतचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्राकडे पाठविला होता. आज या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आलाय.

सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आणि बेळगावचे नामांतर करण्याचा प्रस्ताव सर्वेअर जनरल ऑफ इंडियाकडे प्रलंबित असतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी १२ ऑक्टोबरला नामांतराची घोषणा केली. त्यानंतर मराठी भाषिकांमध्ये नाराजी होती. मात्र केंद्रातल्या सरकारी यंत्रणेने मराठी भाषिकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत कर्नाटक सरकारचा बेळगाव नामांतराचा प्रस्ताव मंजूर केल्याने मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.