भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नवी कार्यकारीणीची नावे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2013, 12:47 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नवी कार्यकारीणीची नावे.
भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात मोदींसह १२ जणांचा समावेश करण्यात आलाय. या मंडळाचे सदस्य आहेत, राजनाथ सिंह, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, एम वैंकेया नायडू, नितिन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, अनंत कुमार, थावर चंद्र गहलोत आणि राम लाल
१० सदस्यीय महासचिव मंडळात राजनाथ सिंह यांनी वरुण गांधी आणि अमित शाह यांना पसंती दिली आहे. महासचिवमध्ये अनंत कुमार, थावर चंद्र गहलोत, जे पी नड्ढा, धर्मेंद्र प्रधान, तापीर गांव, अमित शाह, वरुण गांधी, राजीव प्रताप रूड़ी, मुरलीधर राव आणि राम लाल यांचा समावेश आहे
सचिव - पक्षाने १५ सदस्यांचे सचिव मंडळ तयार केलेय. यात श्याम जाजू, भूपेंद्र यादव, कृष्णा दास, अनिल जैन, विनोद पांडे, त्रिवेंद्र रावत, रामेश्वर चौरसिया, आरती मेहरा, रेणू कुशवाहा, सुधा यादव, सुधा मालवीय, पूनम महाजन, लुई मरांडी, तमिल इसाई आणि वाणी त्रिपाठी यांचा समावेश आहे.
टीम उपाध्यक्ष - सदानंद गौड़ा, मुख्तार अब्बास नकवी, डॉ. सी पी ठाकूर, जुआल उराव, एस एस आहलूवालिया, बलबीर पुंज, सतपाल मलिक, प्रभात झा, उमा भारती, बिजॉय चक्रचवर्ती, लक्ष्मीकांत चावला, किरण माहेश्वरी आणि श्रीमती स्मृती इरानी.
संयुक्त महासचिव – व्ही. सतीश आणि सौदान सिंह
कोषाध्यक्ष - पीयूष गोयल,
मुख्यालय प्रभारी - ओ पी कोहली,
संसदीय दल कार्यालय सचिव - राम कृपाल सिन्हा,
संसदीय दल संयुक्त कार्यालय सचिव - व्ही षणमुगनाथन,
पार्टी प्रवक्ता - प्रकाश जावड़ेकर, शाहनवाज हुसैन, निर्मला सीतारमण, विजय सोनकर शास्त्री, सुधांशू त्रिवेदी, मीनाक्षी लेखी आणि कॅप्टन अभिमन्यू

मोर्चा अध्यक्ष
महिला मोर्चा - सरोज पांडेय,
युवा मोर्चा- अनुराग ठाकूर,
अनुसूचित जाती मोर्चा डॉ. संजय पासवान,
अनुसूचित जनजाति मोर्चा - फग्गन सिंह कुलस्ते,
अल्पसंख्यक मोर्चा - अब्दुल राशिद,
किसान मोर्चा - ओम प्रकाश धनकर
केंद्रीय अनुशासन समिती - राधामोहन सिंह (अध्यक्ष), जगदीश मुखी (सचिव), एल गणेशन (सदस्य), हरी बाबू (सदस्य), श्याम नंदन सिंह (सदस्य) भाजपा केंद्रीय चुनाव समिती - राजनाथ सिंह, अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, एम वैंकेया नायडू, नितिन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, थावर चंद्र गहलोत, राम लाल, गोपीनाथ मुंडे, जुआल ओरन, शाहनवाज हुसैन, विनय कटियार, जे पी नड्डा, डॉ- हषर्वर्धन आणि सरोज पांडे यांच्या नव्या कार्यकारणीत नवांचा समावेश आहे.