www.24taas.com, झी मीडिया, अलीगड
संपूर्ण देशाला लाज आणणारी ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये घडली आहे. कारण एका महिला न्यायाधिशावर घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
ज्यांना न्यायमूर्ती समजलं जातं, त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी त्यांचा भाऊ अनेक अधिकाऱ्यांचे उबंरे झिजवतोय. संबंधित महिला जज प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी अलीगड शहरच सोडून दिलंय.
बहिणीसाठी उपोषण करणार
जर आपल्या बहिणीला तीन ते चार दिवसात न्याय मिळाला नाही, तर आपण उपोषण सुरू करू, असा इशारा पीडित महिला जजच्या भावाने दिला आहे.
महिला जजच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची एसएसपी यांच्याशी भेट होवू शकली नाही, या प्रकरणी कलम 164 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडीत न्यायाधीश महिलेच्या भावाने फर्रुखाबादचे आमदार विजयसिंह यांच्यावर आरोपींना संरक्षण देण्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपी समाजवादी पार्टीशी संबंधित असल्याने आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोपही महिलेच्या भावाने केला आहे.
या आधी जीवघेणा हल्ला, तरीही मोकाट
महिला जजच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार या आधीही त्यांच्या बहिणीवर या लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यावेळी त्यांना जेरबंद करण्यात आलं नव्हतं, पण यावेळी त्यांनी हे घाणेरडं काम केलंय.
महिला जजच्या भावाने अलीगड सिव्हील लाईन पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार ही घटना 2 जून रोजी झाली आहे. ही घटना रात्री साडे बारा वाजता घडली आहे.
बलात्काराची घटना आणि आरोपी मोकाट
सरकारी निवासाला असलेल्या जाळीच्या दाराची कडी तोडून आरोपी आत आले, जजच्या तोंडावर मच्छर मारण्याचा स्प्रे मारण्यात आला, त्या बेशुद्ध झाल्या.
याआधी विरोध केल्याने दोन जणांनी त्यांना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले, यानंतर बलात्काराचा प्रयत्न केला. महिला मॅजिस्ट्रेटने कोर्टाला दिलेल्या 164 च्या जबाबानुसार, दोन लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे.
बलात्कार न्यायाधीशावर किंवा कोणत्याही सामान्य महिलेवर झाला, तरी सरकारी अधिकारी आणि त्यांचा मूड काम करत नसल्याचं दिसतंय. त्याशिवाय जज सोबत बलात्कार करणारे आरोपी आतापर्यंत मोकाट राहिले नसते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.