बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

PTI | Updated: Nov 1, 2015, 02:34 PM IST
बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात title=

पाटणा: बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

या टप्प्यात मुजफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सीतामढी, शिवहर, गोपालगंज आणि सिवान या सात जिल्ह्यांमधील जागांचा समावेश असून, एकूण ७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ५७ महिला आहेत. यावेळी एकूण १,४६,९३,२९४ मतदार १४,१३९ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील.

आणखी वाचा - बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

गेल्या निवडणुकीत ५५ पैकी २६ जागांवर भाजप आणि २४ ठिकाणी संयुक्त जनता दलानं विजय संपादित केला होता. राष्ट्रीय जनता दलाला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं होतं, तर तीन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या होत्या. आता मात्र चित्र पूर्ण पालटलं आहे. महाआघाडीतील राजदनं २६, संजदनं २१ आणि काँग्रेसनं ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 

दुसरीकडे रालोआच्यावतीनं भाजप या टप्प्यात ४२ जागांवर आपल्या उमेदवारांना लढवीत आहे. लोजपा पाच तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसा) प्रत्येकी ४ जागांवर भविष्य अजमावीत आहे. 

आणखी वाचा - बिहार विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.