पाटणा : बिहारमधील परीक्षा केंद्रावर सर्रास चालत असलेल्या कॉपीच्या प्रकारावर लालू प्रसाद यादव यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. "माझं सरकार असतं तर कॉपीसाठी पूर्ण पुस्तकच दिलं असतं", असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय.
बिहारची शिक्षणव्यवस्था कशी झाली आहे, त्याचं हे चित्र आहे, अशाप्रकारे पास करुन विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल, असा सवालही त्यांनी केला आहे, जर सध्याचं सरकार कॉपी थांबवू शकत नसेल, तर आमचं राजद सरकार का हटवलं?, असं बोलायला लालू प्रसाद विसरले नाहीत.
बिहारमधल्या वैशाली केंद्रासह अनेक केंद्रावर पालक विद्यार्थ्यांना खिडक्यांमधून कॉप्या पुरवत असल्याचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. तसेच उत्तर प्रदेशातही कॉपी पकडली म्हणून प्राध्यापकाला मारहाण करण्यात आली, असं सुरू असतांना या वादात लालू प्रसाद यादव यांनी मिश्किल वक्तव्य केली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.