बिहार : राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड , काँग्रेस यांच्यात आघाडी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी रंगत आतापासून आलेय. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र लढविणार आहोत, असे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

PTI | Updated: Jun 4, 2015, 05:04 PM IST
बिहार : राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड , काँग्रेस यांच्यात आघाडी title=

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी रंगत आतापासून आलेय. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र लढविणार आहोत, असे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून या आघाडीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. राजद आणि जदयूमध्ये आघाडी होणार नाही, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आघाडीच्याआधी बिघाडी अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा राहीली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद यादव यांच्या घोषणेमुळे ही आघाडी प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट झाले. 

बिहारमध्ये स्वबळावर सत्तास्थापनेची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मनसुबे उधळण्यासाठीच काँग्रेस, जदयू आणि राजदमध्ये आघाडी झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना विरोध असल्याने राजद या आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, काँग्रेस सहभागी झाल्याने भाजपला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादवांसोबत एका कार्यक्रमात एकत्र येणे टाळले. त्यामुळेही विविध चर्चांना उधाण आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.