बिहारमध्ये मतदानादरम्यान अशी घटना घडलीच नव्हती

बिहारमध्ये विधानसभा मतदान सुरू आहे, या दरम्यान अशी घटना घडली की ती तुम्हाला समजली तर नक्की धक्का बसेल. बिहारमध्ये विधानसभेची जोरदार धामधून सुरू आहे, मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या आहेत, मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येतोय.

Updated: Nov 5, 2015, 06:01 PM IST
बिहारमध्ये मतदानादरम्यान अशी घटना घडलीच नव्हती title=

सहरसा : बिहारमध्ये विधानसभा मतदान सुरू आहे, या दरम्यान अशी घटना घडली की ती तुम्हाला समजली तर नक्की धक्का बसेल. बिहारमध्ये विधानसभेची जोरदार धामधून सुरू आहे, मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या आहेत, मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येतोय.

लोकशाहीसाठी बिहारमध्ये सर्वात महत्वाची घटना घडली आहे, सहरसा जिल्ह्यातील सोनवर्षा शहरातील ही घटना आहे, सोनवर्षा विधानसभा मतदार संघासाठी मतदान सुरू असताना, दुलार चंद्र विश्वास यांचे वडिल मगन विश्वास यांचं सकाळी निधन झालं, त्यांच्या अचानक मृत्यूमुळे परिवारावर दुखाचा संकट कोसळलं.

दुसारचंद्र विश्वास यांच्या प्रेत यात्रेला बराच उशीर होता, मात्र प्रेत यात्रा ही सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास होती, तोपर्यंत मतदानाची वेळ निघून गेली असती. म्हणून दुलार चंद्र विश्वास यांच्या मुलाने घरात वडिलांचं प्रेत असतानाही मतदानासाठी मतदान केंद्र गाठलं, आधी मतदान केलं आणि त्यानंतर अंत्यसंस्कार आणि प्रेत यात्रेच्या तयारीला तो लागला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.