हे असतील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

उत्तर प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. 

Updated: Mar 11, 2017, 10:03 PM IST
हे असतील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. ३२५ जागा जिंकून भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये दोन तृतियांश बहुमत मिळवलंय. या विजयानंतर आता उत्तर प्रदेशातला मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य, लखनौचे महापौर दिनेश शर्मा, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. उत्तर प्रदेशचा नवा मुख्यमंत्री दलित किंवा ओबीसी समाजातला असावा, असं मत भाजपचेच उत्तर प्रदेशातले खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केलं आहे.

भाजपच्या संसदीय समितीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच भाजपचे सगळे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा मुख्यमंत्री कोण असेल यावर निर्णय व्हायची शक्यता आहे.