नवी दिल्ली: भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
भाजपनं नवी दिल्ली सीटहून केजरीवाल यांच्या विरुद्ध नवा चेहरा नुपूर शर्मा तिकीट दिलंय. तर पटपडगंजमधून मनीष सिसोदिया विरोधात विनोद कुमार बिन्नी यांना उमेदवारी दिलीय.
भाजपच्या लिस्टमध्ये अनेक नामवंत चेहरे आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस सोडून नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या कृष्णा तीरथ यांचंही नाव आहे. त्या पटेल नगर (एससी) सीटमधून निवडणूक लढवतील.
दिल्लीचे माजी मंत्री जगदीश मुखी जनकपुरीमधून तर दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजेंद्र गुप्ता रोहिणी सीटमधून निवडणूक लढवतील.
नावांची यादी जाहीर करतांना नड्डा म्हणाले, पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय निवडणूक लढणार नाहीत कारण त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होतेय आणि त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे.
भाजपच्या ६२ उमेदवारांच्या नावाची यादी -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.