भाजपमध्ये पोस्टर्समुळे पक्षांतर्गत वादळ

दिल्लीमध्ये झळकलेल्या पोस्टर्समुळे सध्या भाजपमध्ये पक्षांतर्गत वादळ उठले आहे. 

Updated: Jun 23, 2015, 07:15 PM IST
भाजपमध्ये पोस्टर्समुळे पक्षांतर्गत वादळ  title=
संग्रहीत

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झळकलेल्या पोस्टर्समुळे सध्या भाजपमध्ये पक्षांतर्गत वादळ उठले आहे. 

पक्षाचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री संजय जोशी यांच्या समर्थकांनी हे पोस्टर लावले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचं नाव न घेता टीका करण्यात आली आहे. 

पाकिस्तान-बांग्लादेशला रमजानच्या शुभेच्छा देता, पण केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, संजय जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, नितिन गडकरी, मुरली मनोहर जोशी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल मन कलुषित आहे, असं यात म्हटलंय.

मोदींच्या मन की बात, सब का साथ सब का विकास या घोषणांचाही या पोस्टरमध्ये खुबीनं वापर करण्यात आलाय. वर मोदी आणि शाह यांचे फोटो आहेत, पण त्यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही. बाजुला जोशींचा मोठा फोटो आणि खाली निवेदकांची नावं आहेत.

राजधानीत पंतप्रधान निवासस्थान, शाह, आडवाणी, सुषमा स्वराज तसंच राहुल गांधींच्या घराबाहेर ही पोस्टर्स झळकली आहेत. पहिल्या लुकमध्ये हे पोस्टर संजय जोशींच्याच नावानं लिहिल्याचं वाटतंय. स्वतः जोशी यांनी मात्र आपली या प्रकाराला संमती नसल्याचं 'झी 24 तास'शी बोलताना स्पष्ट केलंय. यावर ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.