नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपलं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भ्रष्टाचार मुक्तीला प्राधान्य देण्यात आलंय. दिल्ली वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यावर भर देण्यात आलाय.
तसंच महिलांच्या सुरक्षेवरही व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भर देण्यात आलाय. व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये
दिल्लीतील रुग्णालयांचा दर्जा सुधारणे, स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्नशील, वीज, पाणी आणि घरं उपलब्ध करुन देणार तसंच 'जिथं झोपडी तिथं घर' अशी आश्वासनं व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये देण्यात आलीयत.
व्हिजन डॉक्यूमेंट प्रसिद्ध करताना दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.