delhipolls

'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!

दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी सट्टाबाजारही हादरला. 'आप'च्या ऐतिहासिक यशामुळं सट्टे बाजारात कहीं खुशी कहीं गम असं वातावरण पसरलंय.

Feb 11, 2015, 10:15 PM IST

दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ

15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

Feb 10, 2015, 04:30 PM IST

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Feb 9, 2015, 10:29 PM IST

भाजपचं व्हिजन: दिल्लीला वर्ल्ड क्लास सिटी बनवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपलं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भ्रष्टाचार मुक्तीला प्राधान्य देण्यात आलंय. दिल्ली वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यावर भर देण्यात आलाय.

Feb 3, 2015, 03:12 PM IST

...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Feb 3, 2015, 12:29 PM IST

दिल्लीकरांची पसंती अरविंद केजरीवाल यांनाच

दिल्लीत भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी किरण बेदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी दिल्लीकरांचा ओपिनीयन पोल काही वेगळंच सांगतोय. झी न्यूज आणि तालीम यांनी केलेल्या सर्वेच्या आधारे दिल्लीकरांनी मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांनाच पसंदी दिली आहे.

Jan 20, 2015, 08:07 AM IST

दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

Jan 20, 2015, 08:04 AM IST

भाजपने किरण बेदी यांना बळीचा बकरा बनवला - आप

आम आदमी पार्टीतून थेट भाजपमध्ये दाखल झालेल्या किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्री पदाच्या रिंगणात उतरवले. मात्र, त्यांना बळीचा बकरा केल्याची टीका आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी केली आहे. पराभवाचं खापर मोदींच्या माथी फुटू नये यासठी भाजपची ही खेळी असल्याचंही ते म्हणालेत.

Jan 20, 2015, 07:58 AM IST

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. 

Jan 19, 2015, 11:48 PM IST

भाजप, काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या! - केजरीवाल

भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या. पण आपली अमूल्य मतं मात्र आम आदमी पक्षालाच(आप) द्या, असं आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Jan 19, 2015, 08:26 AM IST

'आप' नेत्या शाजिया इल्मी भाजपात, निवडणूक लढविण्यास नकार

'आप'च्या स्टार प्रचारक शाजिया इल्मी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 16, 2015, 07:25 PM IST

दिल्ली विधानसभा शिवसेना लढविणार - उद्धव ठाकरे

शिवसेना दिल्ली विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे. दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Jan 16, 2015, 06:01 PM IST