गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याचा भाजपचा दावा

गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपनं केला आहे. भाजपकडे 22चा आकडा असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबत चर्चा केली असून केवळ समर्थन पत्रासाठी भाजप वाट पहाते आहे. पत्र आल्यानंतर लगेचच राज्यपालांकडे सत्तास्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

Updated: Mar 12, 2017, 10:35 AM IST
गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याचा भाजपचा दावा title=

पणजी : गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपनं केला आहे. भाजपकडे 22चा आकडा असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबत चर्चा केली असून केवळ समर्थन पत्रासाठी भाजप वाट पहाते आहे. पत्र आल्यानंतर लगेचच राज्यपालांकडे सत्तास्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

आज गोव्यातील आमदारांची बैठक होते आहे. नितीन गडकरीही कालपासून गोव्यात तळ ठोकून आहेत. त्यामुळे आता मित्रपक्ष भाजपला साथ देतात का आणि भाजप गोव्यात सत्ता स्थापन करते का हे पाहावं लागेल.

Tags: