काळा पैसा भारतात परत येणार ?

4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.

Updated: May 29, 2016, 10:24 PM IST
काळा पैसा भारतात परत येणार ? title=

नवी दिल्ली : 4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यामुळे मोदी सरकरानं काळा पैसा परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी विदेशातील काळा पैसा पुन्हा देशात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वीस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा शोधून काढण्यात सहकार्य देण्याबाबत ते स्वीत्झर्लंडचे अध्यक्ष जोहान स्नीदर अम्मान यांच्याशी चर्चा करतील. 

करारासंबंधी मुद्यांवर माहितीचे आदान प्रदान करता यावे यासाठी मार्ग प्रशस्त करण्याबाबत दोन देशांच्या अधिका-यांनी या कराराला अंतिम स्वरुप देण्याचा प्रयत्न चालवला आहे. भारत आणि अन्य देशांना कराराबाबत आपसूक माहिती देणारी यंत्रणा आणण्यासंबंधी वटहुकुमाबाबत स्वीस सरकारनं 18 मे पासून सल्लामसलतीची प्रक्रिया सुरु केली आहे. 

या विदेश दौ-यात मोदी अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत.