'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!

रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. 

Updated: Dec 10, 2015, 01:30 PM IST
'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा! title=

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. 

त्यामुळे, तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करत असाल तर ही सुविधा तुम्हाला उपयोगी ठरू शकते... यासाठी तुम्हाला केवळ २५० रुपये मोजावे लागणार आहेत. 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ई-बेड रोलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 

अधिक वाचा - मुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार

किती रुपये मोजावे लागणार?
एक चादर, दोन बेडशीट आणि एक उशी - २५० रुपये 
दोन बेडशीट आणि उशी - १४० रुपये
चादर - ११० रुपये

अधिक वाचा - वेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात

'बेडरोल' गुंडाळून घरी घेऊन जा
अशा पद्धतीनं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही या गोष्टी विकत घेऊ शकाल. स्लीपर क्लासमध्येही तुम्हाला ही सुविधा मिळू शकते.  'ई-बेडरोल'मध्ये तुम्हाला एक चादर, दोन बेडशीट आणि एक उशी मिळेल. त्यामुळे, प्रवासादरम्यान लागणाऱ्या या वस्तू तुम्हाला घरातूनच घेऊन याव्या लागणार नाही... पण, रेल्वे प्रवासानंतर या वस्तू तुम्ही घरी मात्र घेऊन जाऊ शकणार आहात. 

कशी मिळवाल ही सुविधा
ही सुविधा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनंही बुक करू शकता किंवा स्टेशनवर आयआरसीटीसीच्या कोणत्याही फूड प्लाझा, फास्ट फूड कॉर्नरवरून मिळवू शकता. 

सुविधेला सुरुवात... 
हा प्रोजेक्ट प्रयोगधर्तीवर सध्या नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या दोन स्टेशन्सपासून सुरू करण्यात आलाय. लवकरच, छत्रपति शिवाजी टर्मिनस (सीएसटी), मुंबई आणि बीसीटी/मुंबई सेंट्रल स्टेशनवरही ही सुविधा या महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.