चेन्नई : जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नि दिला जाणार नाही तर त्यांना दफन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री एमजी रामाचंद्रन यांच्याप्रमाणे त्याचे पार्थिव दफन करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले
.
आता काही वेळातच त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी करण्यात येणार आहे. हिंदू असल्यामुळे त्याचे अत्यंसंस्कार हिंदू परंपरेनुसार व्हायला हवे होते. पण सांगितले जाते की जयललिता यांच्या अंत्यसंस्कारासंबंधी एआयएडीएमकेच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पण त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरविले की त्यांना एमजी रामाचंद्रन यांच्याप्रमाणे दफन करण्यात यावे, त्यामुळे जयललिता यांची समाधी रामाचंद्रन यांच्या शेजारीच असणार आहे.
आता काही वेळाच जयललिता यांच्या पार्थिवाला एमजीआर मेमोरियलमध्ये दफन करण्यात येणार आहे. पार्थिव दफन करण्यासाठी मरिना बीचवर जेसीबी मशीनद्वारे खड्डा खोदण्यात आला.