www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
या योजने अंतर्गत देशातल्या ६७ टक्के जनतेला दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ उपलब्ध होणार आहे. मात्र या योजनेला कायद्याचं स्वरूप देण्यासाठी अन्नसुरक्षा विधेय़क संसदेत मंजूर करून घेण्याचे आव्हान आता सरकारसमोर आहे.
अनेक पक्षांनी आगामी अधिवेशनात हे विधेयक मांडून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही योजना लागू करण्याची घाई झाली आहे. त्यामुळंच अध्यादेश काढून तात्पूरता अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आगामी पावसाळी अधिवेशनात अन्नसुरक्षा विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.