केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीला अपघात

वृंदावन येथून एका कार्यक्रमातून परतत असतांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा जाम होता. सुरक्षा रक्षकांच्या गाड्या देखील सोबत होत्या. 

Updated: Mar 5, 2016, 11:56 PM IST
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीला अपघात title=

नवी दिल्ली : वृंदावन येथून एका कार्यक्रमातून परतत असतांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा जाम होता. सुरक्षा रक्षकांच्या गाड्या देखील सोबत होत्या. 

स्मृती इराणी यांच्या गुढघ्याला आणि हाताला थोडी दुखापत झाली असून सुदैवाने दुसरी कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. अपघातात दोन जण जखमी झाल्याची समजतंय पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.