नवी दिल्ली : कॉल समाप्ती शुल्क अर्थात टर्मिनेशन चार्जच्या मुद्द्यावर टेलिकॉम ऑपरेटर्समध्येच आता वाद सुरु झालेत... आणि उल्लेखनीय म्हणजेच, याच मुद्द्यावर अंबानी बंधू आपले आपांपसातील मतभेद विसरून एकत्र आलेत.
अंबानी बंधुंनी लेवीचा विरोध केलाय तर भारती एअरटेल, आयडिया सेल्यूलर आणि व्होडाफोन यांचा मात्र लेवीला पाठिंबा आहे. ग्रामीण भागात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉल समाप्ती शुल्क लावण्याची गरज आहे, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.
इंटरकनेक्शन उपयोग शुल्काच्या समीक्षेनंतर ट्रायच्या पत्राला उत्तर देताना मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ, अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि व्हिडिओकॉननं आपलं म्हणणं मांडलंय. कॉल समाप्ती शुल्क रद्द करण्यात यावं, या लेवीमुळे ग्राहकांसाठी फोन कॉल्सचे दर महाग होतात, असं त्यांनी म्हटलंय.