अंबाला : लुधियानातील एका ड्रायव्हरने २० रुपये वाचविण्याच्या चक्करमध्ये आपल्या मालकाच्या ७ लाखाच्या कारचा चकनाचूर करून टाकली. ड्रायव्हरला असे करायचे नव्हते पण ते अनावधानाने त्याच्याकडून घडले. पैसे वाचविण्यासाठी इतके मोठे नुकसान होईल हे ड्रायव्हरने स्वप्नातही विचार केला नसेल.
झाले असे की, लुधियानाच्या सरकारी दवाखान्यात आपल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गाडीचा मालक आपल्या इटियोस टोयोटा कारमध्ये आला होता. मालक गाडीतून उतरून गेला. पण ड्रायव्हर पार्किंग शोधू लागला.
रुग्णालयात पार्किंगसाठी २० रुपये घेण्यात येत होते. २० रुपये वाचविण्याच्या चक्करमध्ये ड्रायव्हरने कार रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केली नाही. रुग्णालयाच्या मेन गेटजवळ असलेल्या एका भिंतीजवळ कार पार्क केली.
ड्रायव्हर गाडीतून बाहेर उभार राहिला. थोड्या वेळात मेन गेटजवळ असलेलीही ही भिंत त्या कारवर कोसळली. जोपर्यंत ड्रायव्हर स्वतःला सांभाळत होता. तोपर्यंत मालकाची ७ लाखांची कार चकनाचूर झाली.
दरम्यान, कार ज्या परिस्थिती आहे त्यात रिपेरिंग करणं अशक्य आणि खर्च वेगळा होणार आहे. ड्रायव्हरने २० रुपये वाचविले पण त्याची नोकरी गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.