नोटा बदलून देणाऱ्या RBIच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कारवाई करताना बंगळुरुमधून दोघांना अटक केली.

Updated: Dec 17, 2016, 09:52 PM IST
नोटा बदलून देणाऱ्या RBIच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक title=

बंगळुरु : जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कारवाई करताना बंगळुरुमधून दोघांना अटक केली.

सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या नोटा या कर्मचाऱ्यांनी बदली करुन दिल्या होत्या. नोटाबदली करुन देताना २००० आणि १०० च्या नोटा या कर्मचाऱ्यांनी दिल्या होत्या. वरिष्ठ विशेष सहाय्यक सदानंदा नाईक आणि रोख विभागातील विशेष सहाय्यक ए के केविन अशी या अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या या दोघांना चार दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. नोटाबदली प्रकरणात अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी १३ डिसेंबर रोजी सीबीआयने १ कोटी ५१ लाखांच्या जुन्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती.