नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी नोकरी संदर्भात मोदी सरकारनं तरुणांना एक खुशखबर दिलीय. केंद्राच्या सर्व नोकऱ्यांसाठी आता ऑनलाइन भरती केली जाणार आहे... महत्त्वाचं म्हणजे, यासाठी पोलीस व्हेरिफेकेशनसाठीही आता फार प्रतिक्षा करायला लागणार नाही. उमेद्वारांना फक्त एक लेखी परिक्षा देऊन सरकारी सरकारी नोकऱ्या पटकावता येतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरचं संपूर्ण भरती प्रक्रिया ही ऑनलाइन होणार केली जाईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेद्वारांना नोकरीवर अर्ज केल्यापासून ते रुजू होईपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांची हाजी हाजी करावी लागणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्रेटरीची एक कमेटी प्रत्येक आठवड्यात या सर्व गोष्टींचा पाठपुरावा घेत आहे. याचा अर्थ लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
- केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागातले सेक्रेटरी आणि प्रत्येक राज्याच्या चीफ सेक्रेटरींना या मोहिमेत सहभागी करून घेतलं जाणार आहे.
- 'डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅन्ड ट्रेनिंग'चे सेक्रेटरी संजय कोठारी आणि फॉरेन सेक्रटरी एस.जयशंकर यांना १२ सदस्यांच्या टीममध्ये समाविष्ट करण्यात आलंय.
- तसेच सरकार अर्ज भरणाऱ्यांना ई-स्वाक्षरीची सुविधाही देण्यात येईल. आधार कार्डधारकांनाही ई-स्वाक्षरीची परवानगी दिली गेलीय.
- ई स्वाक्षरीची सुविधा मिळाल्याने अर्ज भरणाऱ्यांना आता फॉर्मसाठी लांब रांगेत उभे राहावं लागणार नाही.
- लेखी परिक्षा शुल्क भरण्यासाठीदेखील यूनिव्हर्सल पेमेंट प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
- तसंच सरकार डिजीटल लॉकरची सुविधा देणार आहे. त्यामुळे सरकारी उमेद्वार आपले कागदपत्र ऑनलाइन तपासू शकतो.
- यासाठी उमेदवारांनी स्वतचे कागदपत्र स्वत: साक्षांकीत केलेले असायला हवेत.
- कनिष्ठ गट 'बी', 'सी' आणि 'डी' साठी याअगोदरच मुलाखती झाल्या आहेत.
- गट 'बी' आणि 'ए' च्या सर्व पोस्टसाठी आता मुलाखती घेतल्या जातील.
- आता अपॉईन्टमेंट लेटरवर सरकारी अधिकाऱ्यांची ई-स्वाक्षरी असेल त्यानंतर उमेद्वारांना ते पोस्टाने पाठवण्यात येतील.