सोळा माजी मंत्र्यांना सांगितलं, बंगल्याचा नाद सोडा!

यूपीए सरकारमधील 16 माजी मंत्र्यांनी अजूनही आपल्या सरकारी बंगल्यांचा ताबा सोडलेला नाही. त्याशिवाय माजी खासदार आणि सरकारी कर्मचा-यांनीही तब्बल 683 फ्लॅट्सवर कब्जा करून ठेवलाय. आता या सर्वांना बंगले आणि घरे खाली करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटीसा बजावल्या आहेत.

Updated: Jul 30, 2014, 08:50 PM IST
सोळा माजी मंत्र्यांना सांगितलं, बंगल्याचा नाद सोडा! title=

मुंबई : यूपीए सरकारमधील 16 माजी मंत्र्यांनी अजूनही आपल्या सरकारी बंगल्यांचा ताबा सोडलेला नाही. त्याशिवाय माजी खासदार आणि सरकारी कर्मचा-यांनीही तब्बल 683 फ्लॅट्सवर कब्जा करून ठेवलाय. आता या सर्वांना बंगले आणि घरे खाली करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटीसा बजावल्या आहेत.

जयपाल रेड्डी, अजित सिंग, कृष्णा तीरथ, सचिन पायलट, एमएम पालम राजू, गिरीजा व्यास, फारूक अब्दुल्ला, बेनीप्रसाद वर्मा, कपिल सिब्बल आणि श्रीकांत जेना या माजी मंत्र्यांनी अजून सरकारी बंगले सोडलेले नाहीत.

वरील सर्व मंत्र्यांकडून तब्बल 21 लाख रूपयांचे देणे वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. त्याशिवाय आणखी 21 माजी मंत्री जनरल पुल बंगल्यांमध्येच वास्तव्याला आहेत. त्यांनाही 15 दिवसांत बंगले खाली करण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.