चाणक्यचा Exit poll जवळ जाणारा

 निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आलेल्या विविध एक्झीट पोलपैकी फक्त चाणक्यचा एक्झीट पोल सर्वात जवळ जाणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2017, 11:35 AM IST
चाणक्यचा Exit poll जवळ जाणारा  title=

नवी दिल्ली :  निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आलेल्या विविध एक्झीट पोलपैकी फक्त चाणक्यचा एक्झीट पोल सर्वात जवळ जाणार आहे. 

दोन दिवसापूर्वी  सहा एक्झिट पोलमधून जनमताचा कौल जाणून घेण्यात आला होता. त्यातील चार एक्झिट पोल्सनी भाजपा उत्तरप्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरेल पण उत्तरप्रदेश विधानसभा त्रिशंकू राहील असा अंदाज व्यक्त केला होता आणि दोन एक्झिट पोल्सनी भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे म्हटले होते. 
 
या एक्झिट पोल्सपैकी चाणक्यचा एक्झिट पोल जवळपास जाणार आहे.   टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने भाजपाला सत्ता मिळेल असे म्हटले होते.  टुडेज चाणक्यने उत्तरप्रदेशात भाजपा  २८५ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे म्हटले होते. सध्या भाजपा त्यापेक्षाही पुढे आहे. पण चाणक्यला जनमताचा नेमका कल ओळखता आला असे त्यातून दिसते. चाणक्याने सपा-काँग्रेस आघाडीला ८८, बसपा २७ आणि इतर ३ जागा मिळतील असे म्हटले होते.

सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार भाजप ३११, सपा काँग्रेस ६५, बसपा, २१ आणि इतर ४ आघाडीवर आहे.  

 

या एक्झीट पोलची टायटाय फीश्शशशशशशश

- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये ४०३ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला १९०ते २१० जागा मिळण्याची शक्यता, समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला ११० ते १३० जागा, बहुजन समाज पक्षाला ५४ ते ५७ जागा .
- नेटवर्क- १८ च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा १८५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष - काँग्रेसला १२० जागा आणि बसपला ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला १६४-१७६ जागा, सपा-काँग्रेसला १५६-१६९ जागा , बसपला ६०-७२ जागा आणि इतरांना २ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 - इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला १८५ जागा , समाजवादी पक्षाला १२० जागा आणि बसपाला ९०  जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे