लखनौ : उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.
पॅरिसमधील 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, यात किमान १२ जण ठार, तर २० जण जखमी झाले होते. यामध्ये मासिकाच्या संपादकाचाही समावेश होता. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याची निंदा केली होती.
मात्र, याउलट उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे खासदार हाजी याकूब कुरेशी यांनी हल्लेखोरांना 51 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी याकूब यांनी प्रेषित मोहंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र काढणाऱ्या डॅनिश पत्रकाराची हत्या करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. तसेच त्यांनी 'रसूल के आशिक उन्हे सजा दे देते है' असेही म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.