मुंबई : महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष मालिका, आकाशवाणी सुरू करणार आहे. ही एक संशोधनपर मालिका आहे.
१९१५ साली गांधीजींचा भारतात परतण्या मागचा दृष्टिकोन दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही मालिका आकाशवाणीचे ज्येष्ठ प्रसारक मधुकर उपाध्याय सादर करतील, अशी माहिती आकाशवाणीकडून देण्यात आलीय.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत. या शताब्दीनिमित्त आकाशवाणीने महात्मा गांधी यांच्यावर १०० भागांची विशेष मालिका तयार करणार आहे.
"प्रत्येक भागाला एक वेगळा महत्व असणार आहे. मोहनदास करमचंद गांधी नावाचे एक महान प्रवासी भारतीय जे पुढे 'महात्मा' म्हणून परिचित झाले, त्यांच्या जीवनाचा बाणेदारपणा प्रवाहीपणे सादर करण्यात येणार आहे.
या मालिकांच्या निर्मितीसाठी उपाध्याय यांनी सहकार्य केले आहे. ही मालिका आकाशवाणीच्या रेन्बो तसेच गोल्ड नेटवर्कवरून ९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते ९.१५ या वेळेत सादर होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.